भोकरदन। भोकरदन तालुक्यातील क्षिरसागर येथे आज घराच्या गोठ्याला लागलेल्या आगीत तीन बालकांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून आग कशामुळे लागली याचे कारण कळु शकले नाही.
तालुक्यातील क्षिरसागर येथील गव्हारे कुटंबाचे घर आहे. या घराशेजारीच त्यांनी जनावरांना बांधण्साठी गोठा बांधला आहे. या गोठ्यामध्ये आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास सार्थक मारोती कोलते (६) वर्ष, वेदांत विष्णु मव्हारे (५) आणि संजिवनी गजानन मव्हारे (५) हे खेळत होते. यावेळी अचानक गोठ्याला आग लागली. तसेच गोठ्याच्या बाजूलाच कडब्याची गंजी होती. तसेच जनावरांना खाद्य म्हणून असलेले भुसाच्या गोण्या होत्या. सपराने पेट घेतल्याने आगीने रौद्ररुप धारण केले ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी त्याठिकाणी घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण कडबा आणि भुसामुळे आग भडकली. याबाबत तात्काळ नागरिकांनी भोकरदनाला अग्निशमन विभागाला कळविले. अग्निशमनदलाचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी आग विझविली. पण या आगीत तीन मुले होरपळून मृत्यमुखी पडल्याचे दिसून आले. घटनास्थळी, ग्रामसेवक नारायण साबळे, सरपंच, व ग्रामपंचायत सदस्यासह भोकरदन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तीनही मुलांचे शव पोस्टमार्टेमसाठी भोकरदनच्या शासकीय आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या घटनेमुळे संपुर्ण गावात शोककळा पसरली.